फक्त 150 तास. त्यानंतर मिशन चांद्रयान-3 ओव्हर; पुढे काय?
भारताचं चांद्रयान मिशन यशस्वी झालं आहे. चांद्रयान-3 ने चंद्रावर जाऊन तिरंगा फडकवला आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.
भारताच्या या मोहिमेवर जगभरातून कौतुक होत आहे. भारताने विज्ञानक्षेत्रात गरूडझेप घेतल्याचंही यातून सिद्ध झालं आहे. चंद्रावर पोहोचलेल्या चांद्रयान-3च्या प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने चंद्रावरील बरीच रहस्य शोधली आहेत. अनेक फोटोही पाठवले आहेत. त्यामुळे चंद्रावरील शोधासाठीच्या मोहिमेला एक वेगळं वळण मिळणार आहे. मात्र, प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरचा 14 दिनाचा काळ संपुष्टात येणार आहे. आता केवळ 6 दिवस बाकी आहेत. या सहा दिवसात चंद्रावरील अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
इस्रोने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 मिशन लॉन्च केलं होतं. या चांद्रयानाने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं होतं. त्यामुळे जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरची अवघ्या 4 दिवसांची लाईफ बाकी आहे. विशेष म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस म्हणजे चंद्रावरील एक दिवस आहे. चंद्रावर सूर्य मावळल्याबरोबर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काम करणं बंद करतील. त्यामुळेच आता विक्रम आणि प्रज्ञानकडे अवघे 150 तास उरले आहेत. त्यांचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे.
एक यान, अनेक मिशन
चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनसह इतर तत्त्व असणं, तापमानातील बदल आणि वेगवेगळ्या क्रेटरबाबत या यानाने शोध घेतला आहे. आता येणाऱ्या काळात चंद्रावरील भूकंपाशी संबंधित घटना, चंद्र आणि पृथ्वीरील सिग्नलचं अंतर, मातीत मिळणाऱ्या कणांचा तपास करायचा आहे. म्हणजे 14 दिवसात चंद्रावर चांद्रयान-3चे अनेक मिशन वेगवेगळ्या टप्प्यावर पार पडत आहेत.
लाईफ अगदी थोडेच
इस्रोने चांद्रयान-3 लॉन्च केलं, तेव्हाच त्याचं लाईफ 14 दिवसाचं असणार हे तज्ज्ञांना माहीत होतं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला डार्क झोन म्हटलं जातं. कारण हा भाग थेट सूर्याच्या संपर्कात येत नाही. तसेच या ठिकाणी बराच काळ अंधार असतो. चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस आहेत. म्हणजे 14 चंद्रावर सूर्याची किरणे येत नाहीत. चंद्रावर 15 दिवस उजेड आणि 15 दिवस अंधार असतो. त्यामुळेच 14 दिवसाच्या लाईफच्या हिशोबाने हे यान चंद्रावर पोहोचवण्यात आलं आहे. आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या परिक्रमा करत आहे.
तर पाण्याची शक्यता
असे असले तरी इतक्या कमी वेळात चांद्रयानाने जे मिळवलं आहे, ते जगातील कोणत्याही देशाला त्यांच्या चांद्र मोहिमेतून मिळवता आलेलं नाही. विक्रम लँडरमधील चेस्ट चंद्रावर ड्रिल करत होता. त्यावरून चंद्रावरील तापमानात किती अंतर आहे हे माहिती पडणार आहे. चंद्राच्या गोलार्धावर 8 सेंटीमीटर खाली तापमान -10 डिग्रीपर्यंत जातं. तर गोलार्धावरील तापमान 60 डिग्रीपर्यंत जातं. चंद्रावर ऑक्सिजनचे 8 तत्व असल्याचं विक्रम लँडरने लिब्स पेलोडने शोधून काढलं आहे. जर चंद्रावर हायड्रोजन आढळून आलं तर तिथे पाणी असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.