डॉ.योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो युवकांच्या हाती ‘घड्याळ’
बीडमध्ये निवडणुकीच्या तोंडावररा ष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग
ना.अजितदादा, धनुभाऊंच्या नेतृत्वामुळे युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ओढा
बीड :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पक्ष प्रवेश केल्यापासून पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांचा जनसंपर्क, प्रभावी कार्यपद्धती पाहून विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
बीड तालुक्यातील अंजनवती येथे दौऱ्यावर असताना डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान कार्डिले यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब जोगदंड, सरपंच बालासाहेब जाधव, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दिकी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, पांडुरंग येडे, अभिमान येडे, सुभाष येडे, अशोक येडे, समीर शेख, फुलचंद येडे, श्रीराम घरत, सुनील घरत, माजेद कुरेशी, मिलिंद ठोकळ, दीपक जगदाळे, शिवाजी घरत, आसाराम घरत, राजेभाऊ क्षीरसागर उपस्थित होते. भाळवणी येथील विनोद बहिरवाळ, भारत डोंगर, संतोष मुळे, भाऊ मस्के, जयराम मस्के, अशोक बहिरवाळ, महेश चव्हाण, बिभीषण दहे, बाळू दहे, गणेश बहिरवाळ, शाम बहिरवाळ, अशोक दहे, किरण चव्हाण, वाघमारे, विलास बहिरवाळ, महादेव मुळे, संदीप मुळे, ऋषिकेश बहिरवाळ, रोहित बहिरवाळ, शुभम बहिरवाळ, सूरज चव्हाण, ओंकार बहिरवाळ, प्रमोद बहिरवाळ, सोमीनाथ दहे, बिभीषण दहे यांच्यासह अनेक तरुणांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, अमर विद्यागर आदी उपस्थित होते. शहरातील कागदी वेस, अजिजपुरा भागातील रवी वडमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी नगरसेवक मुन्ना इनामदार, शुभम धूत, बिलाल शेख, गजानन जवकर, शैलेश गिरी, ज्ञानेश्वर राऊत, किरण बेदरे, डॉ.शेख शकील, शुभम वीर आदींची उपस्थिती होती. आहेर वडगाव येथील शिवाजी रोहिटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी बालासाहेब काटे, गोरख रोहिटे, बाळू रोहिटे, पिंटू सपकाळ, नवनाथ रोहिटे, कृष्णा सोळूंके, सचिन सोळूंके, जावेद शेख, अजित डोंगरे, धनंजय राऊत, मुकिंद रोहिटे, राजाभाऊ रांजवन, शहाजी कदम, लखन रोहिटे, सुदाम रोहिटे, निवेदक बाबासाहेब रांजवन यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग होत असून विरोधी पक्षातील शेकडो युवक कार्यकर्ते, पदाधिकारी ना.अजितदादा, धनुभाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ.योगेशभैय्यांच्या नेतृत्वाखाली हाती ‘घड्याळ’ बांधून घेत आहेत. त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढली आहे.
डॉ.क्षीरसागरांचा संघटन मजबूत करण्यावर भर
ना.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून पक्षाची सदस्य नोंदणी, विविध पद नियुक्त्या, पक्षाचे प्रचार व प्रसाराचे कार्यक्रम राबविणे अशा माध्यमातून निष्ठेने काम करत संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. विकासाचे व्हिजन, थेट जनसंपर्क, तत्पर यंत्रणेमुळे बीड विधानसभा मतदारसंघात डॉ.योगेश यांच्या नेतृत्वावर जनतेचा अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांचा संघटन मजबूत करण्यावर कायम भर राहिला आहे.